spot_img
spot_img
spot_img
spot_img

मराठी साहित्य संमेलनाच्या पत्रिकेत ‘अक्षम्य’ चुका, शिवसैनिकांचा संताप अनावर!

90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेत अक्षम्य चुका आढळून आल्याने शिवसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पददेखिल यात चुकविण्यात आले आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष असे पद त्यांच्या नावासमोर लिहिण्यात आले आहे.

कल्याणमधून लोकसभेवर निवडून गेलेले उच्च शिक्षित खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे एस. एस. ऑर्थोपेडिक आहेत. पण त्यांच्या नावासमोर डॉक्टर लिहिण्यात आलेले नाही. विधान परिषदेचे आमदार रविंद्र फाटक यांचे नाव चक्क पाठक असे लिहिण्यात आले आहे.

कल्याण-डोंबिवली येथील नामवंत आणि अनुभवीत व्यक्तिंना डावलून मर्जीतील लोकांना संमेलनाच्या नियोजन समितीत स्थान देण्यात आल्याने या चुका झाल्याचे शिवसैनिकांनी सांगितले आहे. दरम्यान, आयोजकांनी लगेच या चुका सुधाराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे.

spot_img

Related Articles

एलसीबी, शहर पोलिसांच्या कारवायांनंतरही अवैध धंदे पुन्हा जोमात ! गुटखा-मावा, वाळू , पत्त्योचे अड्डे, गांजा व अमली पदाथांच्या कथित व्यवहारांवर नागरिकांचा संताप; पोलिसांच्या...

एलसीबी, शहर पोलिसांच्या कारवायांनंतरही अवैध धंदे पुन्हा जोमात ! गुटखा-मावा, वाळू , पत्त्योचे अड्डे, गांजा व अमली पदाथांच्या कथित व्यवहारांवर नागरिकांचा संताप; पोलिसांच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह प्रवरातीर...

संगमनेरला १०२ कोटींच्या विविध विकासकामांचा आज शुभारंभ व लोकार्पण   पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ त्यांची प्रमुख उपस्थिती 

संगमनेरला १०२ कोटींच्या विविध विकासकामांचा आज शुभारंभ व लोकार्पण   पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ त्यांची प्रमुख उपस्थिती  संगमनेर : प्रतिनिधी  संगमनेर तालुक्यातील विविध विकासकामांना...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!