spot_img
spot_img
spot_img
spot_img

वाळू तस्करांवर कायद्याचा बडगा.. आता दंड भरून सुटका नाही कठोर कलमान्वये फौजदारी गुन्हा दाखल होणार! संगमनेरच्या महसूल अधिकाऱ्यांनी आतापर्यंत किती वाळू तस्करांवर कारवाया केल्या?

वाळू तस्करांवर कायद्याचा बडगा.. आता दंड भरून सुटका नाही कठोर कलमान्वये फौजदारी गुन्हा दाखल होणार!

संगमनेरच्या महसूल अधिकाऱ्यांनी आतापर्यंत किती वाळू तस्करांवर कारवाया केल्या?

प्रवरातीर | वृतसेवा

संगमनेर प्रतिनिधी-गेल्या अनेक वर्षापासून शासनाचे वाळू उपशाचे धोरण फसवे निघत असल्यामुळे अवयव वाळू तस्करी ला मोठा उत आला आहे वाळू तस्करांना वाहन पकडले तरी भय नव्हता दहा पाच हजार रुपये दंड भरून ते मस्त मोकळे होऊन पुन्हा वाळू तस्करी करत होते मात्र आता शासनाच्या नवीन नियमानुसार सरळ कठोर फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत दंड भरून सुटका होणार नाही म्हणून वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे

दरम्यान सविस्तर माहिती अशी की संगमनेर तालुक्यासह जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर प्रशासनाने आता अधिक कठोर भूमिका घेतली आहे. वाळूचा अवैध उपसा, वाहतूक किंवा तस्करी करताना आढळून आल्यास केवळ दंड आकारून वाहन अथवा संबंधित व्यक्तीची सुटका करण्याऐवजी थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांना मोठा दणका बसण्याची शक्यता आहे.

महसूल विभागाच्या पथकांकडून नदीपात्र, घाट परिसर तसेच वाळू वाहतूक होणाऱ्या मार्गांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. वाळू तस्करीसाठी वापरण्यात येणारी वाहने, यंत्रसामग्री तसेच संबंधित व्यक्तींवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. विशेष म्हणजे, कारवाईनंतर केवळ दंड भरून प्रकरण मिटविण्याची पद्धत आता पुरेशी राहणार नसून, गंभीर स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे अधिकार महसूल अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

अवैध वाळू उत्खननामुळे नदीपात्राची मोठ्या प्रमाणात धूप होत असून पर्यावरणाचा समतोल बिघडण्याबरोबरच शासनाच्या महसुलाचेही नुकसान होते. तसेच अवैध वाहतुकीमुळे रस्त्यांवर अपघातांचा धोका वाढतो. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी महसूल प्रशासनाकडून तपासणी आणि कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली जात आहे.

वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांकडे आवश्यक परवाने, रॉयल्टी पावती आणि वाहतुकीशी संबंधित कागदपत्रे आहेत का, याची तपासणी केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास वाहन जप्त करण्यासह संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

महसूल प्रशासनाच्या या कठोर भूमिकेमुळे वाळू तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, आता दंड भरून कारवाईतून सहज सुटका होणार नसल्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. नागरिकांनीही अवैध वाळू उत्खनन किंवा वाहतूक आढळल्यास प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

spot_img

Related Articles

जुन्या पेंडिंग केसेस चा निपटारा करण्यासाठी संगमनेर पोलिसांचे संबंधितांना हजर होण्याचे फोन दंडात्मक कारवाईचे प्रकरणे त्याच वेळी का मिटवले नाही?

जुन्या पेंडिंग केसेस चा निपटारा करण्यासाठी संगमनेर पोलिसांचे संबंधितांना हजर होण्याचे फोन दंडात्मक कारवाईचे प्रकरणे त्याच वेळी का मिटवले नाही? प्रवरातीर | वृतसेवा संगमनेर प्रतिनिधी-संगमनेर शहर...

नाशिक-पुणे रेल्वेसाठी जनसागर रस्त्यावर; “६० दिवसांत निर्णय द्या, समितीला मुदतवाढ नको!” — आमदार सत्यजीत तांबे “५०० कोटींपेक्षा अधिक निधी वाटप, भूसंपादन झाले; मग...

नाशिक-पुणे रेल्वेसाठी जनसागर रस्त्यावर; “६० दिवसांत निर्णय द्या, समितीला मुदतवाढ नको!” — आमदार सत्यजीत तांबे “५०० कोटींपेक्षा अधिक निधी वाटप, भूसंपादन झाले; मग...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!