जुन्या पेंडिंग केसेस चा निपटारा करण्यासाठी संगमनेर पोलिसांचे संबंधितांना हजर होण्याचे फोन
दंडात्मक कारवाईचे प्रकरणे त्याच वेळी का मिटवले नाही?
प्रवरातीर | वृतसेवा
संगमनेर प्रतिनिधी-संगमनेर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या पेंडिंग केसेस चा निपटारा करण्यासाठी संगमनेर शहर पोलीस ठाण्यातून असंख्य संबंधित आरोपी चाप्टर केसेस मधील नागरिक यांना फोन कॉल सुरू झाले आहेत तुमच्यावर अमुक तमुक प्रकरणाची केस आहे त्याचा निपटारा करण्यासाठी आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो घेऊन या असे सांगण्यात येत असल्याने संबंधित असंख्य नागरिक चाप्टर केसेस झालेले तरुण युवक चक्रावून गेले आहे.
दैनिक प्रवरा तिरला सांगितले गेले की आमच्यावर दोन वर्ष अडीच वर्ष किंवा दीड वर्ष एक वर्ष अशा चॅप्टर केसेस किंवा किरकोळ केसेस आहेत एन डी पी एस च्या केसेस आहेत असे सांगितले जाते सदर प्रकरणे न्यायालयात पाठवण्यासाठी कागदपत्रांची जुळवा जुळवा करण्यासाठी संबंधित आरोपींकडूनच तीनशे ते पाचशे रुपयाची रक्कम घेतली जात आहे कागदपत्रांच्या नावाखाली हे सर्व सुरू आहे जुन्या पेंडिंग केसेस न्यायालयात पाठवून त्या ठिकाणी तुम्हाला दंड होईल तो भरावा व मोकळे व्हावे असे पोलीस सांगत आहेत काही नागरिकांना तर आपण काय केले होते? हेच समजेनासे झाले आहे कारण त्याची अशी की किरकोळ भांडणे म्हणा किंवा इतर प्रकारच्या चॅप्टर केसेस म्हणा अशा प्रकारच्या केसेचा निपटारा केला जात असल्याने व निकाली काढल्या जात असल्याने असंख्य संबंधित आरोपी म्हणा किंवा नागरिक म्हणा यांना पोलिसांचे फोन जात असून याचा त्रास संबंधित नागरिकांना आता भोगाव लागत आहे.
त्याचवेळी त्या केसेस निकाली का काढले गेले नाही? हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे वरिष्ठांच्या आदेशावरून पेंडिंग केसेस चा निफ्टारा करण्याचे काम संगमनेर शहर पोलीस करत असल्याचे दिसून येत असून प्रत्येक आरोपीकडून 300 ते 500 रुपये घेऊन कागदपत्रे बनवून न्यायालयात पाठवले जाण्याचे सांगितले जात आहे त्या ठिकाणी दंड होऊन तुमच्या केसेसचा निपटारा होईल असे पोलीस दादा सांगत असल्याने अनेक संबंधित आरोपी यांची रीघ पोलीस ठाण्यात लागल्याचे वृत्त आहे एकूणच काय तर जुन्या पेंडिंग केसेस चा निपटारा पोलीस ठाण्यात सुरू असून उशिरा का होईना पण नागरिकही संबंधित केस मधून मुक्त होण्यासाठी पोलीस ठाणे गाठत आहे सह्या करत आहेत कागदपत्रे रंगवली जात आहेत आणि ती न्यायालयात पाठवून त्याचा निकाल लागला जाऊन दंडात्मक कारवाई ला सामोरे जावे लागणार आहे एवढे मात्र खरे – संपादक






Total Users : 192051