सोन्नाखोटा ते खडकी रस्ता प्रलंबित, बस वाहतूक ठप्प, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान..!
वडवणी प्रतिनिधी :-
मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत सोन्नाखोटा ते खडकी रस्त्यास मंजुरी मिळाली असून त्या रस्त्याचे काम पूर्ण झाले नसल्याने खडकी देवळा, रुई पिंपळा, सोन्नाखोटा आधी गावातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न बस वाहतूक ठप्प झाल्याने ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न उपस्थित होत असल्याने खडकी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. बस सेवा चालू करण्यासाठी ज्या फुलाचे काम चालू आहे तिथे पर्यायी चांगला रस्ता करण्याची मागणी करण्यात येत आहे. रुई गावाजवळच्या फुलाचे काम चालू आहे. तेथे केलेल्या पर्यायी मार्ग वर ट्रक पलटी झाल्याने पाहणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली यावेळी परिसरातील ग्रामस्थ सरपंच मयूर आंधळे यांनी अधिकाऱ्यांना विनंती करून पर्याय मार्ग व पूर्ण रस्ता दर्जेदार करण्याची मागणी केली.





