संगमनेरात कत्तलखाने पुन्हा सुरू.. 3 टन गोवंश मास जप्तने खळबळ!
छाप्यात पोलिसांनी तीन आरोपी पकडले सहा आरोपी पळाले..
प्रवरातीर | वृतसेवा संगमनेर प्रतिनिधी -मागच्या काळात पोलीस प्रशासनाने व नगरपालिका प्रशासनाने संगमनेरातील पूर्व भागातील तब्बल 14 कत्तलखाने जमीनदोस केले मात्र तरीही जनावरांची कत्तल थांबत नाही मुख्य सूत्रधार मकोका लागण्याच्या भीतीने भूमिगत झाले असले तरी त्यांचीच माणसे हा व्यवसाय चालवत आहेत हे आता स्पष्ट झाले आहे यामुळे संगमनेरातील कत्तलखाने काही बंद होत नाही एका हप्त्यातच दोन वेळा कारवाई झाली कालच्या कारवाईमध्ये तब्बल तीन टनाच्या वर 3100 किलो गोवंश मासासह लाखो रुपयांचा मध्यमाल जप्त केला तीन आरोपींना पकडले असून सहा आरोपी पळून गेले आहेत दरम्यान याबाबत माहिती अशी की
संगमनेर शहरातील जमजम कॉलनी परिसरात सुरू असलेल्या अवैध गोवंश कत्तलखान्यावर पोलिसांनी धडक कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून सहा आरोपी फरार झाले आहेत. या कारवाईत गोमांस, वाहने, कत्तलीसाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि अन्य वस्तूंसह एकूण १५ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना जमजम कॉलनी परिसरात अवैधरित्या गोवंशीय जनावरांची कत्तल सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकला. कारवाईदरम्यान काही जण घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले, तर सहा जण फरार होण्यात यशस्वी झाले. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली असून त्यांचा कसून शोध सुरू आहे.
छाप्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस, कत्तलीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे, वाहने तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले. पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १५.८५ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध विविध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, संगमनेर परिसरात अवैध कत्तलखान्यांवर यापूर्वीही अनेक वेळा कारवाया झाल्या असून, अशा प्रकारचे अवैध व्यवसाय पुन्हा सुरू होत असल्याबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अशा बेकायदेशीर कृत्यांवर सातत्याने कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.






Total Users : 191810