झारीतले शुक्राचार्य कोण? सत्ताधारी प्रयत्न करणार काय? आता सर्वपक्षीय राजकारण्यांना व जनतेला रस्त्यावर उतरावेच लागणार!!!
प्रवरातीर । वृतसेवा संगमनेर प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षापासून नाशिक पुणे रेल्वे मार्गाचे गाजर संगमनेर अकोले सिन्नर व पुणे जिल्ह्यातील तालुक्यांना दाखवण्यात आले मात्र इतक्या वर्षानंतर ऐनवेळी केंद्र शासनाने रेल्वे मार्ग बदलला व ज्या ठिकाणी पूर्वीच रेल्वे आहे त्या ठिकाणी पुन्हा हायस्पीड रेल्वे मार्ग मंजूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत नव्हे तर तो बदलण्यात आलाच आहे आता हा मार्ग पूर्वीसारखाच सिन्नर संगमनेर अकोले व पुणे जिल्ह्यातील तालुके नारायणगाव जुन्नर या ठिकाणच्या जनतेला रस्त्यावर उतरावे लागणार आहे त्याशिवाय हा रेल्वे मार्ग होणार नाही आता नक्की झाले आहे तर एमआयडीसीसाठी देशात प्रसिद्ध असलेल्या सिन्नर तालुका व सहकाराच्या दृष्टीने संपन्न असलेला संगमनेर तालुका अकोले तालुका जुन्नर नारायणगाव असे सर्व पुणे जिल्ह्यातील तालुके यांचा विकास व जनतेच्या विविध समस्या सोडविणारा हा रेल्वे प्रकल्प रद्द झाल्यामुळे या भागातील विकासावर घाला घालण्यात आलेला आहे हा घाला कोणी घातला झारीतला तो शुक्राचार्य कोण असे अनेक प्रश्न जनतेला पडले आहेत हे सर्व बाजूला ठेवा आता जर खरोखरच सिन्नर संगमनेर मार्गे रेल्वे मार्ग करायचा असेल तर यासाठी आता लढा द्यावा लागणार आहे सर्वपक्षीय राजकारणी त्यांचे कार्यकर्ते व आम जनतेने रस्त्यावर उतरून भूतो न भविष्य तो असा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल तरच हा रेल्वे मार्गाचा प्रकल्प पुन्हा या जुन्या मार्गाने होऊ शकेल ज्या ठिकाणी रेल्वे मार्ग जाण्याला अडचण आहे असे सांगण्यात आले त्या ठिकाणी थोडे बाजूला वळसा घेऊन रेल्वे मार्ग काढता येईल मात्र डायरेक्ट रेल्वे प्रकल्प रद्द करणे योग्य नसून आणि जखमेवर मीठ चोळल्यासारखे तोच रेल्वे प्रकल्प ज्या ठिकाणी पूर्वीपासून रेल्वे उपलब्ध आहे त्या ठिकाणी नेण्याचा घाट का घातला जात आहे याचे उत्तर राज्यकर्ते देणार काय हाच मोठा प्रश्न आहे दरम्यान नाशिक–पुणे रेल्वे प्रकल्पातून संगमनेर मार्ग वगळला गेल्याने तालुक्यात नाराजीचे वातावरण आहे. हा प्रश्न केवळ एका पक्षाचा किंवा नेत्याचा नसून संगमनेर, अकोले, सिन्नर, नाशिक आणि उत्तर पुणे परिसराच्या विकासाशी संबंधित असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
तालुक्यातील सुमारे २५ हजार विद्यार्थी आणि हजारो नागरिक शिक्षण व रोजगारासाठी पुण्याकडे प्रवास करतात. रेल्वे सुविधा उपलब्ध झाल्यास प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल. सध्या नागरिकांना पाच ते सहा तासांचा बसप्रवास करावा लागत असून अनेक युवक जीव धोक्यात घालून दुचाकीने प्रवास करतात. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढत आहे.
नागरिकांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी संगमनेरचा हक्काचा रेल्वे मार्ग मिळवण्यासाठी एकत्र यावे, अशी मागणी केली आहे. रेल्वे हा संपूर्ण परिसराच्या आर्थिक, शैक्षणिक आणि औद्योगिक विकासाचा प्रश्न असल्याने आता एकजुटीने लढा उभारण्याची वेळ आली असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. म्हणून आता सर्व प्रकारचे पक्षभेद विसरून राजकारण्यांनी तेही सर्वपक्षीय राजकारण्यांनी एक दिलाने एकत्र यावे त्यांना जनतेची संपूर्ण साथ मिळेल व आपली रेल्वे पुन्हा याच मार्गाने होईल यासाठी आपला एकीचा नारा हवा तरच हे शक्य होणार आहे एवढे मात्र खरे – संपादक






Total Users : 191810