spot_img
spot_img
spot_img
spot_img

संगमनेर शहर व तालुक्यात पुन्हा दुप्पट भावाने गुटखा विक्री जोरात सुरू! अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस प्रशासनासमोर गुटखा किंगांचे आव्हान!!

संगमनेर शहर व तालुक्यात पुन्हा दुप्पट भावाने गुटखा विक्री जोरात सुरू!

अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस प्रशासनासमोर गुटखा किंगांचे आव्हान!!

प्रवरातीर |वृतसेवा

संगमनेर प्रतिनिधी -अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर गुटखा विक्रेत्यांचे व गुटखा साखळीचे धाबे दणाणले गेले होते अनेक गुटखा किंग भूमिगत झाले होते मात्र आता हळूहळू ते बाहेर आले आहेत व अनेक मोक्याच्या ठिकाणच्या टपऱ्या व दुकानांवर पुन्हा एकदा सर्वच प्रकारचे गुटखा विक्री सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे.

विशेष म्हणजे गुटख्याचे भाव दुप्पट करण्यात आले आहेत 25 रुपयाला मिळणारा गुटख्याची पूडी चाळीस रुपयाला मिळत आहे तर 40 रुपयाला मिळणारी गुटख्याची पुडी 80 रुपयाला मिळत आहे याचा अर्थ सर्वच प्रकारचे गुटके दुप्पट भावात विक्री केले जात आहेत संगमनेर शहर व तालुक्यात पुन्हा एकदा गुटखा विक्री जोरात सुरू झाल्याने पोलीस प्रशासन व अन्न व औषध प्रशासन यांच्यासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशाला हरताळ फासला जात आहे संगमनेर शहरात व तालुक्यात बहुतेक ठिकाणी आता गुटखा पुन्हा विक्री सुरू झालेला आहे.

मात्र त्याचे भाव आता दुप्पट झालेले आहे आता अन्न व औषध प्रशासन गुटखा विक्रेत्यांवर व गुटखा किंग यांच्यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे खरे तर अन्न व औषध प्रशासनाला प्रत्येक शहरातील व प्रत्येक तालुक्यातील गुटका किंग व त्यांची साखळी व त्यात कोण कोण सामील आहेत हे सर्व माहिती असताना अन्न व औषध प्रशासन गुटखा किंग यांना अभय देताना दिसत आहेत अहो मुख्य आरोपी म्हणजेच गुटखा किंग जो साखळी चालवतो त्यालाच जर तुम्ही पकडणार नाही तर गुटखा विक्री ही पुन्हा सुरू झाल्याशिवाय राहणार नाही आणि ती झाली सुद्धा संगमनेर शहरात आता सर्वत्र गुटखा मिळू लागला आहे मात्र दुप्पट भावात गुटखा मिळत असल्याने गुटखा शौकिनांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे एकूणच काय तर तुकाराम मुंडे यांच्या आदेशाला हरताळ फासून गुटका किंग पुन्हा सक्रिय झाले आहेत आता अन्न व औषध प्रशासन व पोलीस प्रशासन गुटखा किंग यांच्यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे – संपादक

spot_img

Related Articles

संगमनेरला १०२ कोटींच्या विविध विकासकामांचा आज शुभारंभ व लोकार्पण   पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ त्यांची प्रमुख उपस्थिती 

संगमनेरला १०२ कोटींच्या विविध विकासकामांचा आज शुभारंभ व लोकार्पण   पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ त्यांची प्रमुख उपस्थिती  संगमनेर : प्रतिनिधी  संगमनेर तालुक्यातील विविध विकासकामांना...

त्या कटकारस्थानी पोलीस अधिकाऱ्याची अखेर उचल बांगडी संगमनेर कर नागरिकात समाधान

त्या कटकारस्थानी पोलीस अधिकाऱ्याची अखेर उचल बांगडी संगमनेर कर नागरिकात समाधान प्रवरातीर | वृतसेवा संगमनेर प्रतिनिधी-संगमनेर शहरातील एमडी ड्रग्ज प्रकरणावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!