spot_img
spot_img
spot_img
spot_img

पळवाटा जिवंत असल्याने मटका व्यवसाय बंद होईना. पोलीस प्रशासन हातबल! संगमनेर शहर व तालुक्यात बंद दाराआड अनं ऑनलाइन मटक्याचा धुमाकूळ

पळवाटा जिवंत असल्याने मटका व्यवसाय बंद होईना. पोलीस प्रशासन हातबल!

संगमनेर शहर व तालुक्यात बंद दाराआड अनं ऑनलाइन मटक्याचा धुमाकूळ

प्रवरातीर । वृतसेवा

संगमनेर प्रतिनिधी-अहिल्यानगर जिल्ह्यात एस पी सुदर्शन यांनी मटका व्यवसायावर आळा घालण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात जोरदार कारवाया केल्या तसेच संगमनेर अकोले तालुक्यात सुद्धा केल्या मटक्याची दुकाने बंद करण्यात आली मटका चालकांना वाटले काही दिवसाची गंमत असेल मग नंतर सुरू होईल मात्र असे होत नसल्यामुळे व या व्यवसायातील कामगारांवर बेरोजगारी कोसळल्यामुळे मटका व्यवसाय पुन्हा सुरू करण्यात आले मात्र यावेळेस पळवाटा शोधून व पोलीस प्रशासनाला चिरीमिरी न देता मटका व्यवसाय सुरू करण्यात आले ज्या ठिकाणी पूर्वी मटका व्यवसाय चालत होते त्याच ठिकाणांच्या आजूबाजूला मटका व्यवसायातील लोक मटका घेताना दिसतात तर बंद असलेली मटक्याची दुकाने आतून सुरू असल्याचे दिसत आहे बाहेरून कुलूप दिसत आहे मात्र दाराची कडी उघडी आहे.

अशा ह्या पळवाटा शोधून स्पॉटवर मटका व्यवसाय घेतला जातो तर दुसरी पद्धत ऑनलाइन मटका घेण्याची आहे ज्या व्यक्तीला मटका लावायचा असतो त्याच्याकडे मटका घेणाऱ्याचा मोबाईल नंबर असतो कारण तो दररोज मटका खेळतो त्यामुळे त्याच्याकडे नंबर असतो तो संबंधित व्यक्तीला आपले आकडे फोनवरून देतो आणि फोनवरूनच फोन पे करून पेमेंट दिला जातो विशेष म्हणजे मटक्याचा आकडा लागल्यावर ऑनलाइन सुद्धा पैसे पाठवले जातात त्यामुळे आता पोलीस प्रशासनाने कितीही मटका व्यवसाय बंद करण्याचा प्रयत्न केला तरी मटका व्यवसाय काही बंद होत नाही असे आता स्पष्ट झालेले आहे.

पोलिसांना चिरीमिरी देऊन मटका व्यवसाय सुरू असल्यामुळे मटका चालकांची चलती आहे कारण मोठमोठे हप्ते देण्याची आता गरज राहिली नाही व्यवसाय शंभर टक्के ऐवजी 75 टक्के झाला तरी त्यांना व्यवसाय परवडत असतो त्यामध्ये त्यांना जास्त नफा मिळतो कारण आता कोणालाही एक रुपया देण्याची गरज नाही वरून वरून सर्व बंद आहे असे सांगायचे मात्र आतून सर्व दुकाने ऑनलाइन मटका घेणे सुरूच आहे हे आता लपून राहिलेले नाही आता पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

दरम्यान मटका व्यवसायिकांनी यातून पळवाटा शोधत बंद दारावर ऑनलाईन मटका सुरू केला आहे वर वर ते सर्व बंद आहे असे दाखवत आहेत मात्र त्यांचा हा केवळ बनाव आहे कारण मटक्याची दुकाने बंद जरी दिसत असली तरी आजूबाजूला लपून-छपून व ऑनलाइन मटका सुरूच आहे हे आता लपलेले नाही तर ऑनलाईन मटका जोरात सुरू आहे कारण ऑनलाईन मटक्यात कोणतीही रिस्क नाही त्यामुळे कितीही बंदी घातली तरी मटका व्यवसाय हा ऑनलाईन सुरूच राहणार असे आता स्पष्ट झालेले आहे एकूणच काय तर मटका व्यवसाय वरून बंद दिसतात मात्र लपून छापून बंद दारा आडून व ऑनलाईन मटका व्यवसाय जोरात सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे एवढे मात्र खरे!

spot_img

Related Articles

संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन, पोलीस खाते तसेच उत्पादन शुल्क खाते निद्रावस्थेत! शहरात व तालुक्यात बेकायदा गुटखा मावा विक्री व अवैध दारू ची...

संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन, पोलीस खाते तसेच उत्पादन शुल्क खाते निद्रावस्थेत! शहरात व तालुक्यात बेकायदा गुटखा मावा विक्री व अवैध दारू ची असंख्य ठिकाणी...

संगमनेर शहर व तालुक्यात गुन्हेगारी वाढली. अवैध व्यवसाय बोकाळले! कारवाई झाल्यावर ही पुन्हा अवैध व्यवसाय लगेच सुरू..

संगमनेर शहर व तालुक्यात गुन्हेगारी वाढली. अवैध व्यवसाय बोकाळले! कारवाई झाल्यावर ही पुन्हा अवैध व्यवसाय लगेच सुरू.. प्रवरातीर | वृतसेवा संगमनेर प्रतिनिधी-संगमनेर शहर व तालुका हा आर्थिकदृष्ट्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!