spot_img
spot_img
spot_img
spot_img

संगमनेर शहरात सर्वच अवैध व्यवसाय चोरी चोरी.. चुपके छुपके.. सुरू.. कारवायांचा धडाका नाही नुसता फार्स.. अवैध व्यवसायावर छापे पडल्यावर 15 मिनिटात पुन्हा व्यवसाय जैसे थे!!

संगमनेर शहरात सर्वच अवैध व्यवसाय चोरी चोरी.. चुपके छुपके.. सुरू..

कारवायांचा धडाका नाही नुसता फार्स.. अवैध व्यवसायावर छापे पडल्यावर 15 मिनिटात पुन्हा व्यवसाय जैसे थे!!

प्रवरातीर | वृतसेवा

संगमनेर प्रतिनिधी-संगमनेर शहर व तालुक्यात उघडपणे व राजरोसपणे सर्वच प्रकारचे व्यवसाय सुरू आहेत असतात पोलीस छापे टाकतात कारवाया करतात आणि अवघ्या पंधरा मिनिटात किंवा अर्ध्या तासात अवैध व्यवसाय पुन्हा सुरू होतात हा आजवरचा संगमनेर चा फंडा आहे आणि पोलीस बातम्या देताना अवैध व्यवसायावर कारवायांचा धडाका अहो कसला धडाका नुसता फार्स म्हणावा लागेल याबाबत संगमनेर शहरातील ज्या भागात अवैध व्यवसाय चालतात त्या भागातील नागरिकांनी दैनिक प्रवरा तिरला सांगितले की पोलिसांच्या कारवाया नुसत्या कुचकामी ठरत आहेत.

पोलीस प्रशासन अवैध व्यवसायावर कारवाई करतात तेही एखाद्या वृत्तपत्राने बातमी लावून धरली किंवा ठिकाणे दाखवले तर नावापुरत्या कारवाया केल्या जातात जसे अवैध दारू व्यवसाय अवैद्य ताडी विक्री व्यवसाय यावर पोलिसांनी असंख्य कारवाया केल्या मात्र कारवाया झाल्यानंतर काही वेळातच सदरचे व्यवसाय पुन्हा सुरू होतात हे कोडे कुणालाही उमगले नाही पोलीस जरा उमगून सांगतील का? असे आता नागरिक विचारत आहेत नाशिक रोडवरील एक घटना सांगताना एका व्यक्तीने सांगितले की जय जवान चौकातील एका ताडीच्या अवैध व्यवसायावर छापा टाकला त्याला जेमतेम आठ-दहा दिवस झाले असतील प्रवरातीरणे सदर बातमी लावून धरली होती या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सदर ठिकाणी अवैध ताडी विक्री केंद्रावर छापा टाकला 1000 लिटर ताडी जप्त केली व पोलीस एका आरोपीला कारवाई करून निघून गेले व अवघ्या पाचच मिनिटात सदर ताळी विक्री केंद्र पुन्हा सुरू झाले.

याचा अर्थ पोलिसांच्या कारवाया नुसत्या फार्स ठरत आहेत एवढे मात्र खरे संगमनेरात अवैध अमली पदार्थ विक्री अवैध दारू विक्री अवैध गुटखा विक्री अवैध ताडी विक्री व यासह सर्वच प्रकारचे अवैध व्यवसाय सुरू आहेत पोलीस कारवाई करतात व नंतर काही वेळाने सदर व्यवसाय सुरू होतात याचा अर्थ जनतेने काय घ्यावा? हाच मोठा प्रश्न आहे – संपादक

spot_img

Related Articles

संगमनेरला १०२ कोटींच्या विविध विकासकामांचा आज शुभारंभ व लोकार्पण   पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ त्यांची प्रमुख उपस्थिती 

संगमनेरला १०२ कोटींच्या विविध विकासकामांचा आज शुभारंभ व लोकार्पण   पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ त्यांची प्रमुख उपस्थिती  संगमनेर : प्रतिनिधी  संगमनेर तालुक्यातील विविध विकासकामांना...

त्या कटकारस्थानी पोलीस अधिकाऱ्याची अखेर उचल बांगडी संगमनेर कर नागरिकात समाधान

त्या कटकारस्थानी पोलीस अधिकाऱ्याची अखेर उचल बांगडी संगमनेर कर नागरिकात समाधान प्रवरातीर | वृतसेवा संगमनेर प्रतिनिधी-संगमनेर शहरातील एमडी ड्रग्ज प्रकरणावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!