spot_img
spot_img
spot_img
spot_img

संगमनेर शहर व तालुक्यात गुन्हेगारी वाढली. अवैध व्यवसाय बोकाळले! कारवाई झाल्यावर ही पुन्हा अवैध व्यवसाय लगेच सुरू..

संगमनेर शहर व तालुक्यात गुन्हेगारी वाढली. अवैध व्यवसाय बोकाळले!

कारवाई झाल्यावर ही पुन्हा अवैध व्यवसाय लगेच सुरू..

प्रवरातीर | वृतसेवा

संगमनेर प्रतिनिधी-संगमनेर शहर व तालुका हा आर्थिकदृष्ट्या व सहकार क्षेत्रात अग्रेसर असा तालुका आहे या तालुक्याचे नाव राज्यभर पसरले आहे येथील सहकार राज्यात प्रसिद्ध आहे एकीकडे अशी आनंदी बातमी असतानाच दुसरीकडे मात्र संगमनेर शहर व तालुका हा गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होणारा सर्वात मोठा तालुका म्हणावा लागेल संगमनेर तालुक्याचा विस्तार फार मोठा आहे यामध्ये संगमनेर शहर व तालुका असे दोन पोलीस स्टेशन मुख्य असून उप पोलीस स्टेशन वेगवेगळ्या बिटांमध्ये आहे जसे घारगाव साकुर तळेगाव आश्वी असे विविध प्रकारचे पोलीस ठाण्यांची बीट सक्रिय असतानाही गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे संगमनेर शहरात तर कोणता गुन्हा घडत नाही असेच म्हणावे लागेल या ठिकाणी दररोज काही ना काही गुन्हेगारी सुरूच असते चोरी घरफोडी दागिने चोरी धूम स्टाईल दागिने चोरी चाकूचा धाक दाखवून दागिने चोरी असे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे घडत आहेत दुसरीकडे क्रिमिनल घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत अमली पदार्थ विक्रीचे शहरात मोठे जाळे पसरलेले आहे संगमनेरातील कत्तलखाने सुरूच आहेत नशेच्या गोळ्या इंजेक्शनची विक्री सुरू आहे.

तर इतर प्रकारच्या मोठमोठ्या क्रिमिनल घटना घडत आहेत नुकतेच संगमनेरात सौंदर्यप्रसाधनाच्या माध्यमातून पाकिस्तान कनेक्शन उघड झाले आहे सराईत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे पोलीस प्रशासन गुन्हेगारी रोखण्यात अपयशी ठरत आहे कारण पोलीस बळ हवे तेवढे कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये नाही ही महत्त्वाची बाब वरिष्ठान पर्यंत पोहोचवली गेली पाहिजे संगमनेरचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर हे चांगले कार्य करत असतानाही गुन्हेगारी मात्र कमी होताना दिसत नाही संगमनेरात राजकीय दबाव पोलिसांवर मोठ्या प्रमाणात येतो कधी सत्ताधारी तर कधी विरोधक हे पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात मात्र विशिष्ट परिस्थितीतही बारवकर हे सर्वांना सांभाळून घेतात सर्वांचे काम करून देतात हे विशेष पोलीस प्रशासनातील अधिकारी असो किंवा कर्मचारी असो यांना दोन ते तीन वर्षे फक्त एका ठिकाणी राहावे लागते त्यामुळे ते फारसे काही गंभीर नसतात कायमस्वरूपी त्यांना इथे राहायचे नाही आहे तोपर्यंत आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणी हेच त्यांचे काम आहे म्हणून पोलीस निरीक्षक समीर बारवकर तसेच तालुका पोलीस निरीक्षक व सर्व घारगाव आश्वी तळेगाव धांदरफळ सर्व बीट मधील अधिकाऱ्यांनी गुन्हेगारीवर चाप आणण्यासाठी प्रयत्न करण्याची खरी गरज आहे पोलिसांवर टीका करायची म्हणून हा लेख नाही तर पोलीस प्रशासनातील त्रुटी दूर व्हाव्या हाच उद्देश या लेखाचा आहे आणि यासाठी हा लेख प्रपंच – संपादक

दरम्यान संगमनेर शहर व तालुक्यात चोरी आणि घरफोडीच्या दोन स्वतंत्र घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांनी एकूण सुमारे ९७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची प्रकरणे संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाली आहेत.

पहिल्या घटनेत संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आढळा पुलाजवळील गावठाण परिसरातून अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या मालकीचे सुमारे ३५ हजार रुपये किमतीचे चार मोठे व तीन लहान बैल/जनावरे चोरून नेल्याची तक्रार दाखल झाली आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

दुसऱ्या घटनेत संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळे येथे घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत सुमारे ६२ हजार रुपये किमतीची रोकड व बोकड चोरून नेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३३१ (४) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

spot_img

Related Articles

संगमनेरला १०२ कोटींच्या विविध विकासकामांचा आज शुभारंभ व लोकार्पण   पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ त्यांची प्रमुख उपस्थिती 

संगमनेरला १०२ कोटींच्या विविध विकासकामांचा आज शुभारंभ व लोकार्पण   पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ त्यांची प्रमुख उपस्थिती  संगमनेर : प्रतिनिधी  संगमनेर तालुक्यातील विविध विकासकामांना...

त्या कटकारस्थानी पोलीस अधिकाऱ्याची अखेर उचल बांगडी संगमनेर कर नागरिकात समाधान

त्या कटकारस्थानी पोलीस अधिकाऱ्याची अखेर उचल बांगडी संगमनेर कर नागरिकात समाधान प्रवरातीर | वृतसेवा संगमनेर प्रतिनिधी-संगमनेर शहरातील एमडी ड्रग्ज प्रकरणावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!