spot_img
spot_img
spot_img
spot_img

संगमनेर शहर व तालुक्यातील गुटखा लॉबी सक्रिय. प्रशासन निष्क्रिय! 25 रुपयाची गुटखा पुडी चाळीस रुपयाला तर चाळीस रुपयाची पुडी 80 रुपयाला!!

संगमनेर शहर व तालुक्यातील गुटखा लॉबी सक्रिय. प्रशासन निष्क्रिय!

25 रुपयाची गुटखा पुडी चाळीस रुपयाला तर चाळीस रुपयाची पुडी 80 रुपयाला!!

प्रवरातीर | वृतसेवा

संगमनेर प्रतिनिधी-युवक व तरुण पिढीला बरबाद करणाऱ्या अवैध गुटखा विक्रीला संगमनेर शहर व तालुक्यात पुन्हा एकदा जोराने विक्रीला सुरुवात झाली असून दुप्पट भावात गुटखा विकला जात आहे 25 रुपयाची गुटख्याची पुडी चाळीस रुपयाला तर चाळीस रुपयाची गुटख्याची पुडी 80 रुपयाला विकली जात आहे याचा अर्थ सरळ सरळ दुप्पट भावात गुटका विक्री केली जात असतानाही व गुटखा लॉबी सक्रिय पुन्हा एकदा झाली असताना सुद्धा अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस प्रशासन निष्क्रिय झाल्याचे दिसत आहे.

गुटका किंग पुन्हा एकदा मैदानात उतरले असून त्यांचे एजंट सुद्धा आता सक्रिय झाले आहेत गुटखा जर हवा तर दुप्पट भावात मिळेल असा अलिखित फतवा या गुटखा माफी यांनी काढल्यामुळे जे गुटखा शौकीन आहेत ते दुप्पट भावात सुद्धा गुटखा विकत घेऊन खात आहेत शहरातील व तालुक्यातील बहुतेक गावात व टपऱ्यांवर खुलेआम गुटखा विक्री दुप्पट भावात सुरू आहे यांना रोखणारा कोणीही दिसत नाही अन्न व औषध प्रशासन तर नावालाच राहिले आहे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आदेश दिल्यानंतर साधारणतः वीस दिवस गुटख्याची विक्री बंद होती ती आता पुन्हा एकदा जोरात सुरू झाली आहे तुकाराम मुंडे यांच्या आदेशाला हरताळ फासण्यात आलेला आहे आता तुकाराम मुंढे संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

दरम्यान संगमनेर शहरात चार तर ग्रामीण भागातील असे सात मोठे डीलर गुटख्याचे आहेत ते पद्धतशीरपणे आपली साखळी वितरणाची चालवत असतात त्यांच्या एका डीलरकडे भाग चे भाग दिलेले असतात संगमनेर शहरातील भाग वाटून घेण्यात आलेले आहेत या भागात तुम्ही फिरायचे नाही तुमच्या भागात आम्ही फिरायचे नाही चुपचाप गुटखा वितरित करायचा किराणा दुकानदार टपरीवाले यांना तो द्यायचा दुप्पट भावाला विकायला लावायचा आणि मोठ्या प्रमाणात नफा कमवायचा असा आता हा फंडा गुटखा लॉबीने चालवलेला आहे आता धडाकेबाज आयुक्त तुकाराम मुंढे हे या अधिकाऱ्यांना कसे हँडल करतात व त्यांच्यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे संगमनेर शहरात आर एम डी विमल गोवा हिरा आधी गुटके मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत मात्र त्यांचे भावपूर्वीपेक्षा दुप्पट झालेले आहेत यामुळे आता गुटखा विकत घेताना शौकिनांना तीनदा विचार करावा लागणार आहे एवढे मात्र खरे – संपादक

spot_img

Related Articles

संगमनेरला १०२ कोटींच्या विविध विकासकामांचा आज शुभारंभ व लोकार्पण   पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ त्यांची प्रमुख उपस्थिती 

संगमनेरला १०२ कोटींच्या विविध विकासकामांचा आज शुभारंभ व लोकार्पण   पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ त्यांची प्रमुख उपस्थिती  संगमनेर : प्रतिनिधी  संगमनेर तालुक्यातील विविध विकासकामांना...

त्या कटकारस्थानी पोलीस अधिकाऱ्याची अखेर उचल बांगडी संगमनेर कर नागरिकात समाधान

त्या कटकारस्थानी पोलीस अधिकाऱ्याची अखेर उचल बांगडी संगमनेर कर नागरिकात समाधान प्रवरातीर | वृतसेवा संगमनेर प्रतिनिधी-संगमनेर शहरातील एमडी ड्रग्ज प्रकरणावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!