spot_img
spot_img
spot_img
spot_img

संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन, पोलीस खाते तसेच उत्पादन शुल्क खाते निद्रावस्थेत! शहरात व तालुक्यात बेकायदा गुटखा मावा विक्री व अवैध दारू ची असंख्य ठिकाणी विक्री!!

संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन, पोलीस खाते तसेच उत्पादन शुल्क खाते निद्रावस्थेत!

शहरात व तालुक्यात बेकायदा गुटखा मावा विक्री व अवैध दारू ची असंख्य ठिकाणी विक्री!!

प्रवरातीर । वृतसेवा

संगमनेर प्रतिनिधी-संगमनेर शहर व तालुका मोठ्या प्रमाणात विस्तारलेला आहे या ठिकाणी जवळपास पूर्वीपेक्षा तिप्पट लोकसंख्या झालेली आहे संगमनेर शहर समनापुर पासून ते कासारात दुमाला पर्यंत व घुलेवाडी पासून ते संगमनेर खुर्द पर्यंत विस्तारलेले आहे या ठिकाणी अनेक बाहेरची लोक स्थायिक झालेले आहेत यामुळे शहराचा विस्तार खूप मोठा झालेला आहे राज्य शासनाने अवैध गुटखा विक्री व अवैध अमली पदार्थ विक्री त्याचप्रमाणे अवैध दारू विक्री यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार केलेल्या असताना याच यंत्रणांच्या आशीर्वादाने संगमनेर शहर व तालुक्यात बेकायदा धंदे जोरात सुरू आहेत संगमनेर शहरातील प्रत्येक टपरीवर दुकानावर हमखासपणे गुटका व मावा व सुगंधी तंबाखू विक्री केला जातो यामुळे अन्न व औषध प्रशासन यांचे धिंडवडे निघाले आहे शहरात व तालुक्यातील हॉटेल नाशिक पुणे महामार्गावरील हॉटेल्स कोल्हार घोटी महामार्गावरील हॉटेलस यातील 90% ठिकाणी अवैध मध्य विक्री होत आहे सदर हॉटेल कडे कोणतीही परवाने नाही तरीही दारू विकली कशी काय जाते? यामुळे राज्य उत्पादन शुल्कचे सुद्धा धीदवङे निघालेले आहेत यासाठी या अधिकाऱ्यांची या खात्यात नेमणूक करण्यात आली मात्र त्यांचे कर्तव्यच ते विसरले चे दिसते अन्न व औषध प्रशासनाला आयुक्त तुकाराम मुंडे यांनी कळक आदेश दिलेले आहेत की कुठेही बेकायदा गुटका विक्री मावा विक्री झाली नाही पाहिजे नाहीतर संबंधित अधिकारी जबाबदार धरला जाईल असे असतानाही संगमनेरात सर्वत्र अन्न व औषध प्रशासनाच्या सहकार्याने बेकायदा गुटका मावा विक्री जोरात सुरू आहे तर राज्य उत्पादन शुल्क च्या आशीर्वादाने संगमनेर शहर व तालुक्यात सर्वत्र असंख्य ठिकाणी अवैध दारू विक्री सुरू आहे एवढे मात्र खरे.

दरम्यान राज्य शासनाने प्रत्येक पोलीस ठाण्यांमध्ये अमली पदार्थ विरोधी पथक करण्यात सांगण्यात आलेले आहे मात्र संगमनेर शहर व तालुक्यात कुठेही अमली पदार्थ विरोधी पोलिसांचे पथक दिसले नाही केवळ घोषणा करणे एवढाच अर्थ तर नाही ना अशी शंका आता नागरिकांना येऊ लागली आहे संगमनेर शहरात किमान दहा ठिकाणी अमली पदार्थ विक्री होतात याची कल्पना पोलिसांना आहे मग अमली पदार्थ विरोधी युनिट कुठे आहे? असाही प्रश्न नागरिक विचारत आहेत एकूणच काय तर संगमनेर शहर व तालुक्यात अवैध गुटखा मावा विक्री अवैध दारू विक्री व अवैध अमली पदार्थ विक्री जोरात सुरू आहे 

दरम्यान संगमनेर शहर व तालुक्यातील पोलीस प्रशासन बेकायदा गुटखा विक्री मावा विक्री अवैध मध्य विक्री याकडे दुर्लक्ष करत आहेत वरील दोन्ही खाते आपले कर्तव्य बजावत नसताना पोलीस प्रशासन सुद्धा बघ्याची भूमिका घेत आहे एवढे मात्र नक्की!- संपादक

spot_img

Related Articles

संगमनेरला १०२ कोटींच्या विविध विकासकामांचा आज शुभारंभ व लोकार्पण   पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ त्यांची प्रमुख उपस्थिती 

संगमनेरला १०२ कोटींच्या विविध विकासकामांचा आज शुभारंभ व लोकार्पण   पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ त्यांची प्रमुख उपस्थिती  संगमनेर : प्रतिनिधी  संगमनेर तालुक्यातील विविध विकासकामांना...

त्या कटकारस्थानी पोलीस अधिकाऱ्याची अखेर उचल बांगडी संगमनेर कर नागरिकात समाधान

त्या कटकारस्थानी पोलीस अधिकाऱ्याची अखेर उचल बांगडी संगमनेर कर नागरिकात समाधान प्रवरातीर | वृतसेवा संगमनेर प्रतिनिधी-संगमनेर शहरातील एमडी ड्रग्ज प्रकरणावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!