spot_img
spot_img
spot_img
spot_img

संगमनेर तालुक्यात अवैध वाळू उपशाला उधाण; महसूल व पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह  

संगमनेर तालुक्यात अवैध वाळू उपशाला उधाण; महसूल व पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह  

संगमनेर, प्रतिनिधी : संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. खांडगाव, नर्सरी परिसर, प्रवरा नदीवरील मोठ्या पुलाखालून तसेच कसारा दुमाला परिसरात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची वाहतूक होत असल्याचे सांगितले जात आहे.

स्थानिकांच्या मते, प्रवरा नदीचे मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असून त्यामुळे नदीपात्राचे नैसर्गिक स्वरूप धोक्यात आले आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडण्याबरोबरच भविष्यात पूल, रस्ते व नदीकाठच्या शेतीवरही याचा गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, संबंधित परिसरात अवैध वाळू तस्करी होत असताना महसूल विभागातील तलाठी व स्थानिक पोलिस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या आरोपांमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

नागरिकांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, खनिकर्म विभाग तसेच पोलिस प्रशासनाने तातडीने संयुक्त कारवाई करून अवैध वाळू उपसा कायमस्वरूपी बंद करावा, अशी मागणी केली आहे.

spot_img

Related Articles

संगमनेरला १०२ कोटींच्या विविध विकासकामांचा आज शुभारंभ व लोकार्पण   पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ त्यांची प्रमुख उपस्थिती 

संगमनेरला १०२ कोटींच्या विविध विकासकामांचा आज शुभारंभ व लोकार्पण   पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ त्यांची प्रमुख उपस्थिती  संगमनेर : प्रतिनिधी  संगमनेर तालुक्यातील विविध विकासकामांना...

त्या कटकारस्थानी पोलीस अधिकाऱ्याची अखेर उचल बांगडी संगमनेर कर नागरिकात समाधान

त्या कटकारस्थानी पोलीस अधिकाऱ्याची अखेर उचल बांगडी संगमनेर कर नागरिकात समाधान प्रवरातीर | वृतसेवा संगमनेर प्रतिनिधी-संगमनेर शहरातील एमडी ड्रग्ज प्रकरणावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!