संगमनेर तालुक्यातील अवैध वाळू व गौण खनिज उपशाचा विषय ऐरणीवर.. चाललय काय??
महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे वाळू तस्करातील वैमनश्यातून प्राण घातक हल्ले व गोळीबारापर्यंत मजल!!
संगमनेर तालुक्यातील अवैध वाळूचा उपसा आता ऐरणीवर आला आहे कारण गेल्या काही वर्षात वाळू उपशातील स्पर्धा व वैमनस्य हे आता शिगेला पोहोचले आहे गौण खनिज जसे मुरूम वाळू डबर याचा अवैध उपसा तालुक्यात सर्वत्र सुरू आहे प्रवरा व महाळुंगी नदी मुळा नदी यामध्ये बेसुमार वाळू उपसा सुरू आहे ठिकाणे टाकण्याची काहीच गरज नाही झालेल्या कारवायातूनच ते स्पष्ट होते एकूणच संपूर्ण तालुक्यात आवाज उपसा मोठ्या जोमान सुरू असताना महसूल प्रशासन थातूरमातूर कारवायांवर वेळ निभावून नेत असल्याचे दिसते मात्र दुसरीकडे आता वाळू तस्करीतील व अवैध गौण खनिज उत्खननाच्या मुद्द्याला गंभीरतेने घेतले जात नाही म्हणूनच वाळू उपसा व अवैध गौण खनिज याचा मोठा प्रमाणात उपसा होत आहे आता महसूल प्रशासनाने अशा घटना लक्षात घेता वाळू उपसा रोखण्याची गरज आहे मागच्या काळात शासकीय अधिकाऱ्यांवर वाळूची वाहने घालण्याच्या घटना घडल्या आहेत वाळू तस्करातील वाद व प्राण घातक हल्ल्याची ही घटना घडली आहे नुकतेच आता मालुंजे येथे गौण खनिज उत्खननातून गोळीबार झाल्याचे घटना घडली आहे तक्रारदाराने तसे तक्रारीत म्हटलेले आहे हा विषय अत्यंत गंभीर आहे म्हणून वाळू उपसातील शासकीय धोरण निश्चित काय आहे याचा पण उलगडा होत नाही योग्य धोरण नसल्यामुळेच अवैध वाळूचा उपसा होत असतो वर्षानुवर्षांपासून संगमनेर तालुक्यात व संगमनेर शहर परिसरात असणाऱ्या प्रवरा म्हाळुंगी या नद्या पोखरल्या जात आहेत ज्याला जिथे वाटेल तिथे तो वाळू उपसा करत आहे कोणी टेंपोने तर कोणी पोकलेन लावून कोणी ट्रॅक्टर लावून कोणी रिक्षातून अशा विविध प्रकारे प्रवरा नदीला पोखरले जात आहे प्रशासनाचा लाखोंचा महसूल बुडला जात आहे म्हणून महसूल प्रशासनाने बघ्याची भूमिका न घेता वाळू उपशाचे धोरण निश्चित करून अवैध वाळू उपसा रोखावा अशी आम जनतेची मागणी आहे दरम्यान समजलेल्या माहितीनुसार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे समर्थक असलेले फिर्यादी संदीप घुगे (वय ४३) हे रात्री जेवण करून घराबाहेर शतपावली करत असताना, दोन मोटारसायकलवरून सहा जण तेथे आले. त्यातील एका गाडीवर विशाल हौशीराम खेमनर (रा. अंभोरे), प्रवीण ठकाजी पुणेकर व सुदर्शन शिवाजी श्रीराम (दोघे रा. डिग्रस) हे होते. विशाल व प्रवीण यांनी घुगे यांना पाहताच पिस्तूल उपसून ‘तुझा कार्यक्रम आवरला’ असे म्हटले, तर सुदर्शन तलवार घेऊन त्यांच्या देशाने धावला.
प्रसंगावधान राखून घुगे यांनी घरात पळ काढत दरवाजा आतून बंद केला. हल्लेखोरांनी त्यांच्या दिशेने दोन राऊंड फायर केले, यातील एक गोळी दरवाजा छेदून आत शिरली. त्यानंतर आरोपींनी तलवारीने दरवाजा व खिडक्यांच्या काचा फोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. घुगे आणि त्यांचे कुटुंबीय घरात लपून बसल्याने मोठा अनर्थ टळला. ‘आज वाचलास, पण जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देत आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
दरम्यान ही घटना केवळ एका गावातील गुन्हा नसून, संगमनेर तालुक्यात वर्षानुवर्षे सुरू असलेल्या गौण खनिजाच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीच्या प्रश्नाने आता हिंसक स्वरूप धारण केल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. मुरूम, वाळू, दगड आणि मातीच्या अवैध व्यवहारांवर वेळेत प्रभावी नियंत्रण ठेवण्यात यंत्रणा अपयशी ठरत असल्याची टीका आता अधिक तीव्र झाली आहे.
आता केवळ गोळीबारातील आरोपींवर कारवाई करून हा विषय संपणार नाही. या वादामागील संपूर्ण गौण खनिज साखळी, त्यातील आर्थिक व्यवहार, संबंधित जबाबदार घटक आणि संभाव्य संरक्षण यांचा निष्पक्ष तपास होणे आवश्यक आहे. आणि घडणाऱ्या सर्वच प्रकारच्या हिंसक घटना मागील नेमके सत्य काय आहे हे देखील उघड व्हायला हवे येवढे मात्र खरे – संपादक






Total Users : 191810