spot_img
spot_img
spot_img
spot_img

भंडारदरा पाणलोटात मुसळधार पावसाचा कहर; धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली

भंडारदरा पाणलोटात मुसळधार पावसाचा कहर; धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली

अहिल्यानगर, दि. ७ (प्रतिनिधी): उत्तर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घाटघर परिसरात सुमारे सहा इंच पावसाची नोंद झाली असून त्यामुळे भंडारदरा धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. धरणात सध्या सुमारे २,५८९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा असून धरण ३५.३२ टक्के भरले आहे. तर निळवंडे धरणात १,६७७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा असून ते ११.२८ टक्के भरले आहे.

अकोले तालुक्यातील भंडारदरा पाणलोटात आणि परिसरात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. सततच्या पावसामुळे आदिवासी भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी घरांभोवती पाणी साचले आहे. थंड वातावरणामुळे नागरिकांना शेकोट्यांचा आधार घ्यावा लागत आहे. डोंगरकड्यांवरून मोठ्या प्रमाणात धबधबे कोसळत असून ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. परिणामी भंडारदरा धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.

दरम्यान, राहुरी तालुक्यासह परिसरातही रात्रभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुळा धरणात नव्याने पाण्याची आवक सुरू झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे कोतूळकडील मुळा नदीतून धरणात पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. सध्या मुळा धरणात २४.७० टक्के पाणीसाठा असून त्यापैकी उपयुक्त साठा केवळ १ टक्का आहे. मात्र नव्याने सुरू झालेल्या पाण्याच्या आवकेमुळे नगर शहरासह राहुरी, नेवासा, पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील शेतकरी व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, अहिल्यानगर जिल्ह्यात पुढील दोन दिवस काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यास यलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी नदी-नाले, धबधबे व पूरग्रस्त भागांपासून दूर राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच शेतकरी व नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

नाशिक-पुणे रेल्वेसाठी जनसागर रस्त्यावर; “६० दिवसांत निर्णय द्या, समितीला मुदतवाढ नको!” — आमदार सत्यजीत तांबे “५०० कोटींपेक्षा अधिक निधी वाटप, भूसंपादन झाले; मग...

नाशिक-पुणे रेल्वेसाठी जनसागर रस्त्यावर; “६० दिवसांत निर्णय द्या, समितीला मुदतवाढ नको!” — आमदार सत्यजीत तांबे “५०० कोटींपेक्षा अधिक निधी वाटप, भूसंपादन झाले; मग...

संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन, पोलीस खाते तसेच उत्पादन शुल्क खाते निद्रावस्थेत! शहरात व तालुक्यात बेकायदा गुटखा मावा विक्री व अवैध दारू ची...

संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन, पोलीस खाते तसेच उत्पादन शुल्क खाते निद्रावस्थेत! शहरात व तालुक्यात बेकायदा गुटखा मावा विक्री व अवैध दारू ची असंख्य ठिकाणी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!